
Ramnaam Book (Print Copy – 4 Books in one set)
Aniruddha’s Universal Bank of Ramnaam implies a notebook which gives the devotees an opportunity to recollect the sacred name of God. Every page of the book has Lord Hanumanta’s image watermarked in the background, on which the devotees get the golden opportunity to write various names of God. While writing Ramnaam notebook we get connected with the divine name of the Lord which we chant while writing it. This is the biggest benefit of writing the Ramnaam books.

आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तींची वाढती संख्या लक्षात घेता आपत्तींना उचित प्रतिसाद कसा द्यावा, धैर्याने सामोरे कसे जावे ह्याबाबतचे प्रशिक्षण, येणार्या काळात प्रत्येक नागरिकाच्या हिताचे तर ठरेलच, पण त्याचे ते कर्तव्यही असेल आणि हे पुस्तक नेमका हाच हेतू साध्य करते.
Available in English

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 साली स्थापन झाला. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नव्वद वर्षांपूर्वी रोवलेल्या बीजाचे आता विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाच्या शाखा किती, पाने किती याची मोजदाद करणे अवघड आहे. पण ही संघटना भारतीय जनमानसात खूप खोलवर आपली मुळे रोवून समर्थपणे उभी आहे आणि वटवृक्षाच्याच गती आणि शैलीने विकास करीत आहे. केवळ देशातच नाही, तर जिथे जिथे म्हणून भारतीय आहेत, त्या त्या देशांमध्ये संघ कार्यरत आहेच. इतकेच नाही, तर परदेशातील भारतीयांना आपल्या देशाशी, संस्कृतीशी घट्टपणे जोडून ठेवणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना नाही, तर परंपरा बनलेली आहे.
Available in English Hindi, & Gujarati

On the 11th of September 2001, i.e. no sooner had the third millenium begun, than every nation in the world began to reflect over its protection and to consider afresh its future political policies. ……. The misery inflicted by terrorist activity that India had been suffering through many years, boomed so powerfully into the face of the U.S.A. that it ended up scorching it completely. And the U.S.A., that had hitherto constantly turned a blind eye towards the evidence presented by India, was forced to roll up its sleeves and prepare to fight terrorism, the very terrorism that it had once nurtured and fostered.
Available in English & Hindi

On the 26th of May, 2013, mega event was organized, a grand evening in the world of devotion and devotional music, in which selected abhangas right from the first cassette Bol Bol Vaache, Ailtiri Pailtiri, Pipasa 1 & 2, Pipasa Pasarli, Vahini Mhane, Bapu Thy Grace till Kaay Goad Guruchi Shaala, was sung live. The Video DVD of the same is now available.

गेली अनेक वर्षे ’भारतीय प्राचीन बलविद्ये’ चे संशोधक- मार्गदर्शक व तज्ञ प्रशिक्षक म्हणून डॉ. अनिरूध्द धैर्यधर जोशी (अनिरूध्द बापू) (एम.डी.- मेडिसिन) कार्य करित आहेत. एक यशस्वी र्ह्युमॅटोलॉजिस्ट असलेल्या डॉ. अनिरूध्दांनी आपल्या अनेक वर्षांच्या व्यासंगाने संपादित केलेले भारतीय प्राचीन बलविद्येचे प्रकार त्यांनी आता सर्वांकरिता खुले केले आहेत. ’भारतीय प्राचीन बलविद्या’ हा विषय त्याच्या नावावरुन गूढ वटतो, ज्याचे कुतूहल व आकर्षण शतकानुशतके विदेशी लोकांनाही वाटत आले आहे. जोपर्यंत ही भारतीय प्राचीन बलविद्या आपल्या देशात आदर केला जात होता तोपर्यंत भारतदेशही वैभवाच्या शिखरावर होता. ह्या देशातील तरुणांना ह्या प्राचीन बलविद्येचे प्रशिक्षण जात्याच मिळत असल्यामुळे देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोण्त्याही शत्रुदेशाची हिंमत नव्ह्ती. पुढे कालौघात ह्या बलविद्यांचे आमच्या देशातील महत्व कमी कमी होऊन त्या हळूहळू लोप पावल्या अ त्यानंतर भारतदेश विदेशी आक्रमकांच्या तावडीत गेला. आज त्याच लोप पावलेल्या भारतीय प्राचीन बलविद्येचे प्रथम आचार्य रविंद्रसिंह मांजरेकर ह्यांना बापूंनी ही सर्व भारतीय प्राचीन बलविद्या स्वत: शिकवली. आता डॉ. अनिरूध्दांच्या मार्गदर्शनाखाली व आचार्य रविंद्रसिंहांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली ह्या भारतीय प्राचीन बलविद्याचे प्रशिक्षणवर्ग चालवले जातात. डॉ. अनिरूध्दांनी आचार्य रविंद्रसिंहांना दिलेल्या प्रशिक्षणवरुन व ह्या प्रशिक्षणवर्गात शिकवल्या जाणार्या बलविद्येच्या प्रकारांवरुन हे पुस्तक (टेक्स्टबुक) संकलित करण्यात आलेले आहे.

न्यायवैद्यक शास्त्र ह्याबाबत सामान्य माणसांना जरी प्रचंड उत्सुकता असली तरी त्यातील फारच थोडी माहिती असते. डॉ.वसुधा आपटे ह्या न्यायवैद्यक शास्त्रातील प्राध्यापिका व तज्ज्ञ आहेत. अनेक किचकट व अवघड वाटणार्या प्रकरणांमध्ये त्यांनी नायर हॉस्पिटल, मुंबई येथे काम करत असताना न्यायालयास मदत केली आहे. जे ज्ञान त्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना देत असत किंवा न्यायालयात त्या ज्ञानाच्या आधारे साक्ष देत असत, ते सर्व ज्ञान अतिशय साध्यासोप्या व सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने त्यांनी लिहून सर्वांना उपलब्ध करून दिलेले आहे. ह्या विषयावर इंग्रजीत अनेक पुस्तके आहेत परंतु मराठीमध्ये मात्र ह्या प्रकारचे हे पहिलेच पुस्तक असावे असे वाटते.

हे पुस्तक संवेदनशील मनाचं व्यक्तीचं प्रतिबिंब आहे. आजूबाजूच्या दुलर्क्षित केलेल्या घटनांकडे बघून… त्यांचा अंदाज बांधून त्यावर लेखिका आशाताई वाबगावकर यांनी स्वत:चे विचार व्यक्त केले आहेत. अनेक गोष्टींना वेगळ्या नजरेने….वेगळया दृष्टिकोनातून पाहण्याचा अंदाज हा आपल्याला स्पर्शून जातो. एखाद्या गायकाने रागांमधून सुरांचं मंथन आपल्यासमोर पेश करावं त्या अनुभवांच्या संगीताचे राग आळवत त्यांनी आपल्या जगण्याचं मंथन आपल्यासमोर मांडलं आहे अन् हे लिखाण त्यांच्या नावाप्रमाणेच आशादायी आहे, प्रफुल्लित करणारं आहे.

हा ग्रंथ म्हणजे आई महिषासूरमर्दिनी चण्डिकेच्या वात्सल्याचाच आविष्कार. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंद्वारा विरचित हा ग्रंथ तिच्या कार्याची, चरित्र व हेतूची ओळख तर करून देतोच पण ह्या आईच्या मायेची जाणीव करून देऊन, तिचा पदर धरून रहाणे शिकवतो. श्रद्धावानांना तिच्या छत्रछायेचे आश्वासन देतो.
ह्या आईचे प्रेम मानवी जीवनाला सामर्थ्य पुरवणारी शक्ती आहे. शुभ तत्त्वाला होकार आणि अहिताला वेळीच ओळखून नकार देण्याची शक्ती; भक्ती व नैतिकता ह्यांना दृढ करणारी शक्ती आणि साहजिकच तिच्या पुत्राचे -परमात्म्याचे प्रेम प्राप्त करण्याचा, त्याच्या जवळ जाण्याचा मार्ग. तिचे रूप सौम्य असो की उग‘, ती भक्तप्रेमापोटीच व कार्यहेतूप्रमाणे ते धारण करते व तिची सर्व रूपे शुभच असून भक्तकल्याणासाठीच असतात. अंतत: सत्याचा, शुभाचाच विजय ती घडवून आणते.
गायत्रीमाता, आई महिषासूरमर्दिनी चण्डिका व अनसूया माता ह्या तीन स्तरावर कार्य करत असल्या तरी मूलत: एकच असतात.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात की हा ग‘ंथ आदिमातेचे गुणसंकीर्तनही आहे, ही ज्ञानगंगा आहे आणि भक्तीभागिरथीही आहे. सर्व श्रद्धावानांसाठी सर्व काळासाठी सद्गुरु श्रीअनिरुद्धबापूंनी दिेलेले आदिमातेच्या प्रेमाचे, रक्षणाचे आणि आधाराचे आश्वासन म्हणजे ‘मातृवात्सल्यविंदानम्’

हा ग्रंथ म्हणजे श्रीप्रभूरामचंद्रांच्या जन्मापासून अयोध्येत रामराज्य स्थापन होईपर्यंतच्या रामकथेचे जीवनसार आहे. यातील चित्रेसुद्धा त्या त्या कथेच्या अनुषंगाने आहेत. रावण हा प्रतीक आहे द्रुष्प्रारब्धाचा व तामसी अहंकाराचा, ज्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये भय उत्पन्न होते. सद्गुरु श्रीअनिरुद्ध सांगतात, ’दुष्प्रारब्धरूपी रावण आपल्या जीवनातून शांती–तृप्तीरूपी जानकीला पुरुषार्थरूपी रामापासून वेगळे करतो. अहंकार हाच ज्याचा प्राण आहे आणि काम, क्रोध, मोहासारखे षड्रिपू अशी ज्याच्या मनाची मूलद्रव्यं आहेत अशा रावणाचा वध रामाकडूनच होतो. मानवाला सतावणार्या अशा दुष्प्रवृत्ती व दुष्प्रारब्धाचा नाश होतोच. पण केव्हा? जेव्हा आपण रामाचे वानर बनतो तेव्हा.’

श्रद्धावानांच्या प्रेमापोटी, त्यांच्या जीवनाला उचित दिशा मिळावी ह्या कळकळीपोटी सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्याला दिलेले आदिमातेच्या प्रेमकृपेचे आश्वासन. आई चण्डिकेची क्षमा, रक्षण आणि अर्थातच आधार ह्या ग‘ंथामधून आपल्यापर्यंत ते पोहोचवतात. श्रद्धावानाच्या मनातील सर्व प्रश्न, भय दूर करून भक्ती आणि सामर्थ्य दृढ करणारा हा सर्वश्रेष्ठ ग‘ंथ आहे. हा हितकारक बदल घडवणारा हा ग‘ंथ केवळ दिशादर्शकच नाही तर चण्डिकाकुलाच्या प्रेमामुळे ह्या दिशेने प्रवास करण्याची ताकदही देतो. आई चण्डिकेकडे नेणारा मार्ग सदैव खुला असतो, द्वार उघडे असते ही जाणीव करून देणारा हा ग‘ंथ आपल्या आतमधली अनेक बंद द्वारे अलगद उघडतो, आपल्या आतमधील अनेक अडथळे अलगद दूर करतो आणि ह्या आईच्या कृपेच्या मोकळ्या मार्गावर आणतो. असे जेव्हा घडते, तेव्हाच आईच्या जवळ नेणार्याखुल्या द्वाराची जाणीव होते. आणि हे कार्य हा ग‘ंथ, म्हणजेच सद्गुरुंचा कळकळीचा शब्द नक्कीच साध्य करतो.

‘सत्यप्रवेश’ हा श्रीमद्पुरुषार्थ ग‘ंथराजाचा पहिला खंड असून सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या जीवनकार्याला अनुसरून गृहस्थजीवनामध्ये राहून परमार्थ प्राप्तीची म्हणजेच नरजन्माचा सर्वश्रेष्ठ हेतू साध्य करण्याचा मार्ग दिग्दर्शित करतो. हा मार्ग आहे सामान्य जीवनामध्ये
भक्ती व निष्काम कर्मयोगाचा भक्ती व सेवेचा सहज समावेश, प्रवेश घडवून आणणारा; भगवंताच्या प्रेमाची जाणीव सतत जागृत ठेवणारा आणि म्हणूनच धैर्य, निर्भयता व पुरुषार्थ ही मूल्ये जीवनामध्ये बाणवणारा.
भक्ती, पुरुषार्थ ह्यांचा नेमका व खरा अर्थ समजावून समाजामध्ये रुजलेल्या चुकीच्या समजुती, अंध विश्वास आणि भय ह्यांपासून मुक्त करणारा व आनंदी आणि विवेकी गृहस्थ व सामाजिक जीवन घडवणारा.
‘सत्यप्रवेश’ एका अशा सुंदर क्षेत्राचे दरवाजे खुले करून देतो जिथे भगवंताच्या प्रेमाची सतत जाणीव हेच सर्वोच्च सत्य असतं व मग प्रत्येक श्रद्धावानाचा ह्या सुंदर क्षेत्री प्रवेश म्हणजेच ‘सत्यप्रवेश’ घडतो.

‘आनंदसाधना’ म्हणजे मर्यादामार्गावर परमेश्वरावर प्रेम करत वाटचाल करत असताना आनंद प्राप्त करून घेण्याचे विविध उपाय. ‘साधना’ म्हणजे खडतर जीवनपद्धती नसून ‘साधना’ म्हणजे उचित ध्येयाच्या दिशेने केलेले पुरुषार्थी प्रयास आणि ही अशी साधना नेहमीच सद्गुरुकृपेशी जोडणारी म्हणजेच सद्गुरुंच्या सोबत, त्यांच्या प्रेमासोबत जोडणारी – जीवनामध्ये सत्यप्रवेश घडणे म्हणजेच जीवनाचा प्रेमप्रवास आणि जीवनामध्ये आनंदसाधना.
‘पूजन’, ‘व‘त’, ‘उपासना’, ‘तपश्चर्या’ हे सर्व भगवंताच्या अधिकाधिक जवळ नेणारेच असतात. ह्या खंडामध्ये सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सर्वसामान्यांना ह्या संकल्पनांचा खरा अर्थ समजावून सांगतात. शिवाय ‘पुरुषार्थगंगा’ ह्या विभागामध्ये सद्गुरु-परमत्म्याकडून म्हणजेच सर्वोच्च स्थानाकडून आपल्याकडे आलेला पवित्र व मंगल प्रेमगंगेचा असा प्रवाह, जो रोजच्या जीवनामध्ये आपल्याला सामर्थ्य आणि आनंदाची प्राप्ती तर करून देतोच शिवाय मर्यादामार्गावर दृढ करून एका बाजूने सद्गुरुंबरोबर जोडलेले ठेवतो व दुसर्या बाजूने कुटुंब, समाज, ह्या संस्थांचे घटक म्हणूनही आपला विकास घडवून आणतो. ह्या प्रवाहाच्या तीर्थाचे सेवनम्हणूनच सर्वार्थाने हितकारी!
तेव्हा ‘आनंदसाधना’ म्हणजे प्रेमप्रवास करत असलेल्या श्रद्धावानांसाठी आनंदाची साधना व हेच सत्य.

प्रत्येक जीवाचा, किंबहुना ह्या सर्व विश्वाचाच प्रवास……… हे विश्व ज्याच्यामधून उद्भवले, ज्याच्यामध्येच ते लय पावते, ‘तो’च एकमेव अंतिम सत्य, प्रेमाचा मूळ स्रोत आणि आनंदाचाही. मानवजीवनाचा सर्वोच्च हेतूही तोच – भगवंत. ह्या भगवंताच्या दिशेने गती करणे हा प्रवास आणि भगवंत – सद्गुरु-परमात्मा आपले ध्येय.
आपला हा प्रवास भगवंताच्याच प्रेमाने प्रेरित असल्यास तो आनंदी आणि परिपूर्ण होतो. हे प्रेमच सामर्थ्यदायी, पुरुषार्थ व निर्भयता देते. भगवंताच्या प्रेमाची जाणीव प्रवास भक्तीमार्गावर दृढ करते.
‘प्रेमप्रवास’ हा ग‘ंथ ह्या अशाच सुंदर प्रवासाचे आश्वासन आहे कारण प्रत्येकाचा प्रवास भगवंताच्या (प्रेम)दिशेने आणि भगवंताच्या (प्रेम) सहवासातच करायचा असतो. हा प्रवास प्रत्येकाच्या जीवनामध्ये कसा घडू शकतो आणि त्यासाठी कोणते प्रयास घडावे लागतात ते सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सहज-सोप्या शब्दांत आपल्याला सांगतात.
‘पूर्वरंगा’मध्ये हा भगवंत कसा अनंत, अपार आहे ते आपण समजून घेतो. ‘श्रीरंगा’मध्ये ह्या अनंत भगवंताचे अगदी प्रत्येक जीवावर असीम प्रेम असतेच, आपण त्याच्याजवळ जाण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी काय प्रयास घ्यावे हे आपण समजून घेतो. – आपला विकास घडण्यासाठी अगदी आहारामध्ये करण्याचे बदलही आणि जीवनामध्ये वेळेचे, कार्याचे नियोजन ह्याबद्दलही मार्गदर्शन आपल्याला मिळते. ‘मधुफलवाटिका’ हा तिसरा विभाग म्हणजे वानरवीरांचे विश्रामस्थान – जेथली फळे ओज, सामर्थ्य व अर्थातच आनंद देणारी आहेत – म्हणजेच सद्गुरु श्रीअनिरुद्धबापू ज्या श्रीमद्पुरुसार्थाला ज्या ‘मधा’ची उपमा देतात, तशीच औषधी व मधुर.
‘प्रेमप्रवास’ आणि ‘सत्यप्रवेश’ हे एकेमेकांपासून वेगळे नाहीत आणि हे दोन्ही आनंददायीच आहेत.

Today, English is no longer a language merely for learning; it is the most common language in which people communicate with one another. Therefore, it has become a must for everybody to have at least an elementary knowledge of English. The inferiority complex of conversing in English, the boring task of looking for meanings of difficult words from the dictionary, and things such as these, have kept people away from conversing in English even when required.
The book which is born out of the untiring efforts of Dr. (Mrs.) Nanda Aniruddha Joshi, offers a fragrant and flowering garden of words and vocabulary covering the elementary as well as the subtler aspects of the English language not just for the BEGINNERS, but for the those who are well versed in the English language.