हे पुस्तक संवेदनशील मनाचं व्यक्तीचं प्रतिबिंब आहे. आजूबाजूच्या दुलर्क्षित केलेल्या घटनांकडे बघून… त्यांचा अंदाज बांधून त्यावर लेखिका आशाताई वाबगावकर यांनी स्वत:चे विचार व्यक्त केले आहेत. अनेक गोष्टींना वेगळ्या नजरेने….वेगळया दृष्टिकोनातून पाहण्याचा अंदाज हा आपल्याला स्पर्शून जातो. एखाद्या गायकाने रागांमधून सुरांचं मंथन आपल्यासमोर पेश करावं त्या अनुभवांच्या संगीताचे राग आळवत त्यांनी आपल्या जगण्याचं मंथन आपल्यासमोर मांडलं आहे अन् हे लिखाण त्यांच्या नावाप्रमाणेच आशादायी आहे, प्रफुल्लित करणारं आहे.