सुन्दरकाण्डाच्या अचिन्त्य, अपरंपार, अद्भुत सामर्थ्याबद्दल बापू म्हणतात-
सुंदरकांडाचे प्रत्येक अक्षर न् अक्षर मंत्रमय आहे, प्रत्येक शब्द न् शब्द ज्ञानगर्भ आहे, प्रत्येक वाक्य दिशादर्शक आहे आणि प्रत्येक ओवी अनेक सूत्रांना पोटात सामावून असणारी आहे.
भले! सुंदरकांड वाचणाराच काय परंतु लिहितावाचता न येत असल्यामुळे केवळ ऐकणारा काय, जो अत्यंत प्रेमाने हे सुंदरकांड वाचेल किंवा ऐकेल, त्याच्यासाठी ह्या सुंदरकांडातील प्रत्येक अक्षर त्या मनुष्यास अर्थ माहीत नसतानाही मंत्रप्रभाव प्रगट करतेच, प्रत्येक शब्द जीवनातील कुठल्या ना कुठल्या अनुभवाशी आपोआप जोडला जाऊन त्याच्या गर्भातील अर्थ त्या मनुष्याच्या बुद्धीत व मनात उतरवतोच, प्रत्येक वाक्य त्यामागील संदर्भ माहीत नसले तरीही तसे संदर्भ त्या व्यक्तीच्या आजूबाजूस उत्पन्न करून त्या मनुष्यास दिशादर्शन करतेच आणि प्रत्येक ओवी कुठलेही भलेमोठे ग्रंथ व त्यांतील सूत्रे त्या मनुष्यास माहीत नसतानाही त्या मनुष्याकडून त्या सूत्रानुसार उचित कृती करवून घेतेच.