जीवनात अनेक प्रकारच्या बाधा आपल्या जीवनास क्लेशमय बनवितात. या बाधांचा आपल्या जीवनातील प्रभाव दूर करण्यासाठी, व असा प्रभाव कमी झाल्यावरही श्रद्धावान ‘बाधानिवारक सुदीप’ अर्पण करतात.
दुष्प्रारब्धामुळे प्रापंचिक मानवास शारीरिक, मानसिक किंवा अन्य प्रकारच्या पीडा सतावत असतात. या पीडामुळे त्या व्यक्तीचे, तसेच त्याच्या कुटुंबाचे जीवन कष्टय बनते. या पीडांचा नाश व्हावा यासाठी, तसेच पीडानिवारण झाल्यावरही श्रद्धावान ‘पीडानाशक सुदीप’ अर्पण करतात.
वाढिदवशी आणि मागील वर्षात घडलेल्या मंगल घटनांप्रीत्यर्थ, तसेच कठीण प्रसंगी सद्गुरुंनी दिलेल्या आधाराबद्दल सद्गुरुंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांची कृपा आयुष्यभर अशीच लाभत रहावी ही प्रार्थना करण्यासाठी श्रद्धावान ‘जन्मदिन सुदीप’ अर्पण करतात.
पवित्र मार्गावरून वाटचाल करण्याची इच्छा असूनही अनेक प्रकारच्या मोहांकडे मन ओढले गेल्याने मानवाला मर्यादामार्गावर चालणे कठीण होते. मन:सामर्थ्य प्राप्त व्हावे आणि देवयान पथावरून समर्थपणे प्रवास करता यावा यासाठी श्रद्धावान ‘दर्शन सुदीप’ अर्पण करतात.
आपणास आवडेल, झेपेल असा उचित संकल्प करून हा सुदीप श्रद्धावान अर्पण करतात. स्वत:च्या, आप्तांच्या, अपत्यांच्या क्षेकुशलतेसाठी, विकासासाठी व संरक्षणासाठी संकल्प करून तत्प्रतीकस्वरूपात श्रद्धावान ‘स्वेच्छासंकल्प सुदीप’ अर्पण करतात.
हा सुदीप आपल्या उचित व पवित्र इच्छा पूर्ण होण्यासाठी, किंवा पूर्ण झाल्यावर श्रद्धावान अर्पण करतात. पवित्र व मंगल इच्छापूर्तिसाठी केल्या जाणार्या प्रयासांना बळ मिळावे यासाठी मनोन प्रार्थनाही करतात.