Shreemad Pursharth Granthraj – Aanandsadhana Economy Edition (Marathi)

500

‘आनंदसाधना’ म्हणजे मर्यादामार्गावर परमेश्‍वरावर प्रेम करत वाटचाल करत असताना आनंद प्राप्त करून घेण्याचे विविध उपाय. ‘साधना’ म्हणजे खडतर जीवनपद्धती नसून ‘साधना’ म्हणजे उचित ध्येयाच्या दिशेने केलेले पुरुषार्थी प्रयास आणि ही अशी साधना नेहमीच सद्गुरुकृपेशी जोडणारी म्हणजेच सद्गुरुंच्या सोबत, त्यांच्या प्रेमासोबत जोडणारी – जीवनामध्ये सत्यप्रवेश घडणे म्हणजेच जीवनाचा प्रेमप्रवास आणि जीवनामध्ये आनंदसाधना.
‘पूजन’, ‘व‘त’, ‘उपासना’, ‘तपश्‍चर्या’ हे सर्व भगवंताच्या अधिकाधिक जवळ नेणारेच असतात. ह्या खंडामध्ये सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सर्वसामान्यांना ह्या संकल्पनांचा खरा अर्थ समजावून सांगतात. शिवाय ‘पुरुषार्थगंगा’ ह्या विभागामध्ये सद्गुरु-परमत्म्याकडून म्हणजेच सर्वोच्च स्थानाकडून आपल्याकडे आलेला पवित्र व मंगल प्रेमगंगेचा असा प्रवाह, जो रोजच्या जीवनामध्ये आपल्याला सामर्थ्य आणि आनंदाची प्राप्ती तर करून देतोच शिवाय मर्यादामार्गावर दृढ करून एका बाजूने सद्गुरुंबरोबर जोडलेले ठेवतो व दुसर्‍या बाजूने कुटुंब, समाज, ह्या संस्थांचे घटक म्हणूनही आपला विकास घडवून आणतो. ह्या प्रवाहाच्या तीर्थाचे सेवनम्हणूनच सर्वार्थाने हितकारी!
तेव्हा ‘आनंदसाधना’ म्हणजे प्रेमप्रवास करत असलेल्या श्रद्धावानांसाठी आनंदाची साधना व हेच सत्य.

11 in stock

Categories: , , Tag: