Shreemad Pursharth Granthraj – Prempravas Economy Edition (Marathi)

500

प्रत्येक जीवाचा, किंबहुना ह्या सर्व विश्‍वाचाच प्रवास……… हे विश्‍व ज्याच्यामधून उद्भवले, ज्याच्यामध्येच ते लय पावते, ‘तो’च एकमेव अंतिम सत्य, प्रेमाचा मूळ स्रोत आणि आनंदाचाही. मानवजीवनाचा सर्वोच्च हेतूही तोच – भगवंत. ह्या भगवंताच्या दिशेने गती करणे हा प्रवास आणि भगवंत – सद्गुरु-परमात्मा आपले ध्येय.
आपला हा प्रवास भगवंताच्याच प्रेमाने प्रेरित असल्यास तो आनंदी आणि परिपूर्ण होतो. हे प्रेमच सामर्थ्यदायी, पुरुषार्थ व निर्भयता देते. भगवंताच्या प्रेमाची जाणीव प्रवास भक्तीमार्गावर दृढ करते.
‘प्रेमप्रवास’ हा ग‘ंथ ह्या अशाच सुंदर प्रवासाचे आश्‍वासन आहे कारण प्रत्येकाचा प्रवास भगवंताच्या (प्रेम)दिशेने आणि भगवंताच्या (प्रेम) सहवासातच करायचा असतो. हा प्रवास प्रत्येकाच्या जीवनामध्ये कसा घडू शकतो आणि त्यासाठी कोणते प्रयास घडावे लागतात ते सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सहज-सोप्या शब्दांत आपल्याला सांगतात.
‘पूर्वरंगा’मध्ये हा भगवंत कसा अनंत, अपार आहे ते आपण समजून घेतो. ‘श्रीरंगा’मध्ये ह्या अनंत भगवंताचे अगदी प्रत्येक जीवावर असीम प्रेम असतेच, आपण त्याच्याजवळ जाण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी काय प्रयास घ्यावे हे आपण समजून घेतो. – आपला विकास घडण्यासाठी अगदी आहारामध्ये करण्याचे बदलही आणि जीवनामध्ये वेळेचे, कार्याचे नियोजन ह्याबद्दलही मार्गदर्शन आपल्याला मिळते. ‘मधुफलवाटिका’ हा तिसरा विभाग म्हणजे वानरवीरांचे विश्रामस्थान – जेथली फळे ओज, सामर्थ्य व अर्थातच आनंद देणारी आहेत – म्हणजेच सद्गुरु श्रीअनिरुद्धबापू ज्या श्रीमद्पुरुसार्थाला ज्या ‘मधा’ची उपमा देतात, तशीच औषधी व मधुर.
‘प्रेमप्रवास’ आणि ‘सत्यप्रवेश’ हे एकेमेकांपासून वेगळे नाहीत आणि हे दोन्ही आनंददायीच आहेत.

Out of stock

Categories: , , Tag: